माया आगळी
माया आगळी
फुले हळूहळू कळी
हळूहळू पाकळी पाकळी
फुले हळूहळू कळी
मोहकसे रंग तिचे
नाजुकसे अंग तिचे
मादकसा गंध धुंद
डुले मनमोकळी
फुले हळूहळू कळी
पाहुनिया रुप तिचे
भुले फूल पाखरु
रमे मधुर मधूमिठीत
अधीर हा मधुकरु
अधीर हा मधुकरु
रंग मोह गंध मोह
स्पर्श मोह मधु मोह
माया ही आगळी
माया ही आगळी
फुले हळूहळू कळी
हळूहळू पाकळी पाकळी
फुले हळूहळू कळी
फुले हळूहळू कळी