STORYMIRROR

Umendra Bisen

Classics Inspirational Others

3  

Umendra Bisen

Classics Inspirational Others

माय मराठीचे गुणगान

माय मराठीचे गुणगान

1 min
298

माय मराठी अमुची

पडो न विसर तुझा

दिले कोहिनूर आम्हा

ज्यांचा जगी गाजावाजा


आहे संस्कृत उगम

पूर्वजांची आहे देणं

जपू तिला सांभाळून

आहे आम्हावरी ऋणं


करू भाषेचा जागर

संवर्धन हे निर्धार

तरूणांनी येऊ पुढे

करू भाषा दर्जेदार


ध्यास असावा आपला

नाव व्हावे मराठीचे

अभिजात दर्जा मिळो

हेची संकल्प मनाचे


जपू नैतिक कर्तव्य

मिळविण्या भव्य स्थान

करू गुणगान तिचे

वाढवूया जगी मान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics