माय माझी
माय माझी
पहाटेची थंडी कधी तिला वाजत नाही
सडा रांगोळी अंगणात तिच्या विना नाही
हंंड्यावर हंडेे तिला घेेता येतात कसे
धुन्या भांड्याचे गणित तिचे जुळते कसे
रांधा वाडा उष्टी काढा प्रांतच जणू आहे तिचा
उलट उत्तर नाही मिळत कितीही तुम्ही तिची खेचा
आपलेपणाचा वसा जणू कोळून पिलाय तिने
एकसंदपणाने जगायच कस ठरवलय तिचं तिने
माय माझी साधी भोळी अपेक्षा नसती अमाप तिच्या
तरीही वाटतेे मनात माझ्या वागावे मनाजोगे तिच्या
तिला ही असतील स्वप्ने तिची सांगेल का ती मला
सूप्त मनातील कळ्यांनो थोडे उमलू द्यावे तिला
आजही राबतेय जणू गुुलाबाची नाजूकशी कळी
थकलेल्या चेहर्यावर जरी आली वार्धक्याची वळी
नाही संपत प्रपंंच तिचा नाही थकत तिचे हात
तिच अस्तित्व म्हणजे देव्हार्यातील तेवणारी वात
