STORYMIRROR

Kiran Dongardive

Tragedy

4  

Kiran Dongardive

Tragedy

मातृवंशाचा मोहर

मातृवंशाचा मोहर

1 min
455

आत्मकमळाच्या पाकळ्या खुडताना 

आत्मपीडेचे मृगजळ आले समोर 

कदाचित झडलेल्या पिसार्‍यासाठी 

रडलाही असेल मोर.


वैशाखातच पेटला 

मातृवंशाचा मोहर 

आतड्याचे दोर तुटताना 

बर्फाचेही पेटले शहर. 


फितूर काजव्यांची

लागली चंद्रास माया 

ढगाच्या शोकगीताने 

शहारली रूदालीची काया. 


वाळूच्या विस्तीर्ण अंगणी 

जपता येईनात क्षणाच्या खुणा 

अनोळखी वळणावर विसरला 

मातृछायेचा गंध जुना. 


असा पाकळ्यांनी रंग सोडला 

देठाचीही भरेना पोकळी 

अमूर्त सारंगीच्या सूराने 

तुटत गेली साखळी. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy