Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kiran Dongardive

Inspirational

3  

Kiran Dongardive

Inspirational

सोंगटी (प्यादा)

सोंगटी (प्यादा)

1 min
363


तुमच्या पटावरची प्रत्येक सोंगटी खास आहे;

 प्रत्येक प्याद्याला वजीर होण्याची आस आहे.


तुमची आमची सलगी जातीय सलोखा जसा;

पण शिंपडलेल्या अत्तराला गोमूत्राचा वास आहे.


तुम्ही दिलेला तुकडाच झेलला पिढीजात आम्ही;

आजही का उष्टावलीतला ठेवला घास आहे. 


सूर्य अंधारता माजलेत सारे काजवे येथे;

प्रकाशावे जग सारे.. जागेपणीचा भास आहे.


अरे त्या सतरंज्या उचलण्यापुरते का हमाल आम्ही;

हीच खंत मनात घुसमट अन मी उदास आहे.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational