माणुसकीचे डोह
माणुसकीचे डोह
स्वागत .
ये रे सूर्यदेवा चैतन्याच्या श्वासाने । आपलेपणाच्या ध्यासाने उगव पुन्हा।। .
तळव्यांवर रंगू दे हिरव्या मेंदीची नक्षी । जमो माणुसगंधी पक्षी अंगणात तुझ्या।। .
कालच्या अश्रूचे आटूनिया जावे तळे । अन बहराचे मळे फुलो येथे तेथे।। .
आज नव्या सूर्याचे बिंब शोभो धरतीला । माणुसकीच्या डोह भरतीला अंत नसो ।। .