मार्ग
मार्ग
खोल अंधारलेल्या दरीत,
मी पार बुडालो.
येथुन बाहेर पडायचे आहे,
मार्ग तो न कळे मला
रस्ता तो न दिसे मला,
एक संत,भेटला मज तिथे,
त्या संतानें,त्या खोल सागरात,
तिमीरातुनी लख्ख तेज दाखवले,
आणि सतगुरुची भेट घडवली.
मग, या शिक्षकाने, सामोरी देव प्रकटवला
तिथेच सोहळा भक्तीचा थाटला,
परमानंद या जीवास जाहला
