खरा दागिणा
खरा दागिणा
1 min
144
का? तु या देहाला मानतो
का? तु या देहास अलंकाराने घडवतोस
का? तु या देहाचा अभिमान करतोस
हा तर मातीचा पोकळा
क्षणात मोडतो खेळ सारा
आत्मा खरा दागिणा
लपतो या शिंपल्यामधी
शिंपल्यातील मोती
म्हटले याला संतानी,
परमात्माची भेट
गावली मोतीतुनी
सतगुरु हा दयेचा सागर
मायबाप हा पामरांचा
चरणांशी ठेवितो साधकास
हा कृपाळू अमर...
Kiavi
