STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

मानवाचा लोभ

मानवाचा लोभ

1 min
200

मानवाचा लोभ

झळा ऊन्हाच्या साहूनी

धरा दिसते भकास 

दिसे कोठेच न हिरवे

मन होतसे उदास


 -हास करतो वनांचा

झाडे तोडून कापून

प्राणी मात्र कोठे जाणार

पक्षी गण गेले त्रासून


नाही राहिला निवारा

वृक्षांची ती छत्र छाया

कुठे मिळणार तयांना

सावलीची प्रेमळ माया


पर्ण घेऊनी चोचीत

कष्टी पक्षीण दीनवाणी

देते सावली पिलांना 

वाहे डोळ्यातून पाणी


स्वतःच आरंभिलास घात

तोडून सृष्टीचा प्रेम पाश

 उपयोग काय आता

केला सृष्टी चा सर्व नाश


प्रगतीच्या गोड नावे

मानवाचा अती लोभ

ओढाविला निसर्ग कोप

थांबव मानवा हा क्षोभ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational