STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Tragedy

4  

Mahesh Raikhelkar

Tragedy

"मानवाचा काळ"

"मानवाचा काळ"

1 min
382

पडला भीषण दुष्काळ

मानवाचा बनला जसा तो काळ

नदी, विहरी,धरणे आज आटली

पाण्यावाचून शेतजमीन कोरडी पडली !


पाणी म्हणजे जीवन

त्यासाठी माणूस फिरे आज वणवण

आपणच साधली ही अधोगती

चालवून वृक्षांवर कु-हांडांच्या पाती !


काय कामाची साधून नुसती प्रगती

जनावरे,पशुपक्षी पाण्यावाचून मरती

चहुकडे पसरवली सिंमेटची जंगले

त्यात पाण्याचे दुकाने थाटले !


बोरं मारुनी केली जमिनीची  चाळण

जेवढे ओरबाडून घ्यायचे तेवढे घेतले ओरबाडून

धरणीमातेचा मायेचा झरा गेला आज आटून

ते पाहून अश्रू आले डोळ्यात दाटून !


काहींना दुष्काळाची नसे बसे झळ

साठमारी करुनी करती चंगळ

माणुसकीच्या विरुद्ध त्यांचे हे वागणं

जसे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणं !


प्रगती साधतांना बाळगावी लागेल शुद्ध

उचलणार नाही एकही पाऊल निसर्गाच्या  विरुद्ध

करू पाण्याचे नियोजन तात्काळ

टाळू भावी पिढ्यांच्या जीवनातील  दुष्काळ!


लावूया झाडे वाचवूया पाणी

देवुन मदतीचा हात, पुसू डोळ्यातील पाणी

जरी असली आता  निसर्गाची अवकृपा

माणुसकीचा ओढा मात्र सर्वांनी जपा !

माणुसकीचा ओढा मात्र सर्वांनी जपा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy