'माणूसकीच्या गावात'
'माणूसकीच्या गावात'
पुर्वीच्याकाळी माणूसकीच्या गावात
एकाच घरात दहा कुटुंब
एकत्र रहायचे
दिवसभर काम करूनही
आनंदातच दिसायचे
आपुलकीचं नात
काळजीने जपायचे
प्रेम जिव्हाळा देवून
एकमेकांना सांभाळायचे
थकूनभागून आल्यावर
साऱ्यांची विचारपूस व्हायची
सारे सगळे जमल्यावर
जेवाणाची पंगत बसायची
चांदण्यांच्या छताखाली
आजीआजोबांच्या मागेपुढे
साऱ्या कुटुंबाचा घोळका असायचा
ओसरीवर बैठक मांडून
गप्पांचा फड रंगायचा
रामराम म्हणतं
रात्री सुखाने झोपायचे
भल्या पहाटे कोंबड्याने
बांग दिल्यावर
सारे कुटुंब एकत्र उठायचे
बायकाही डोक्यावयचा पदर
खाली पडू देत नव्हते
कुटूंब प्रमुखांना विचारल्याशिवाय
कोणी काहीच करत नव्हते
काहीही झाल तरी
घर परिवार आपलेपणात बांधून ठेवायचे
वडिलधाऱ्यांचा आदर करून
त्यांच्या धाकात रहायचे
त्याकाळी घरसंसार सर्वांचा गुण्यागोविंदाने चालायचा
एकत्र कुटुंबात समाधानाचा सुगंध
घरभर दरवळायचा
आज भारताच्या इंडियात
कुटुंब विभक्त झाले आहे
फेसबुक इंटरनेटच्या
चक्रव्यूहात फसला आहे
घरात राहूनही कोणी एकमेकाशी बोलत नाही
मोबाईलशिवाय त्यांना कोणीच काही लागत नाही
जग बदलले म्हणून
माणसांच्या माणूसकीला
आपुलकीचा ओलावा
राहीला नाही
म्हणून हरवलेल्या घरात
आपलेपणा असणार नाही
तेव्हा
विभक्त झालेला माणूस
कुटुंबात पुन्हा एकत्र कधीचं येणार नाही
