STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy Inspirational

3  

Deepali Mathane

Tragedy Inspirational

माणुसकीचे वृक्ष

माणुसकीचे वृक्ष

1 min
223

माणुसकीचे वृक्ष दिसती

जागोजागी उभे ठाकलेले

करिती सेवा दिनरात मग

स्व चिंता मागे टाकलेले

    कधी पोलीस कधी डॉक्टर

    कधी मदतीचा हात बनूनी

    माणुसकीचे व्रुक्षच ते दिसे

    सदा माणुसकीला बहरवूनी

माणुसकीची परिभाषा

माणसातच रूजलेली

त्याच्या कर्तव्य परायणात

संकटात दिसे बुजलेली

     माणुसकीच्या वृक्षाची

     फळे गोड,निर्मळ भासती

     इतरांसाठीच्या समाधानाने

     संकटातही मग ती हासती

माणुसकी वृक्षाची सावली

अखंड जगती पसरलेली

सुखवीत जगाला माणुसकीची

पत न दिसे कधी घसरलेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy