STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

माणुसकीचा अंत

माणुसकीचा अंत

1 min
11.5K

माणुसकी नाही राहिली आजच्या जगात

काळीमा फासणारी घटना घडली आपल्या भारतात

प्राण्यांवर प्रेम करा किंवा करु नका

पण असे निर्दयी मारु नका 

थट्टामस्करी असेल तुमच्यासाठी 

दोन जीवांचे गेले बळी 

भुकेलेल्याला खाऊ घालणं आपली संस्कृती 

इथे खाण्यातच ठेवले स्फोटक किती 

दोन जीवांची हत्तीण ती 

भुकेसाठी व्याकूळ ती 

तिला दिले त्या दुष्ट माणसाने फळ खाण्यासाठी

भरलेलं स्फोटकांनी 

बिचारीने ते खाल्ले भुकेपोटी 

स्फोट झाला तिच्या पोटामधी 

दोन जीवांचा झाला अंत 

ती मात्र उभी राहिली पाण्यामध्ये संथ 

काय झालं माणसाच्या बुद्धीला की झाली एवढी विपरीत 

खरंच अंत झाला आहे माणुसकीचा या जन्मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy