माणुसकी चाराक्षरी ,सुंदर रचना
माणुसकी चाराक्षरी ,सुंदर रचना
नाती गोती
दुरावली
माणुसकी
हरवली...१!
महामारी
संकटात
देईना हो
कोणी हात..२!
मजबुरी
मानवाची
कर्म खोटी
दुर्जनांची...३!
जागे व्हावे
आता तरी
वृत्ती डावी
सोडा खरी...४!
शिकवण
दिली जरी
माणुसकी
आहे बरी...५!
जपा नाती
माणुसकी
प्रेम ,माया
आपुलकी...६
देव दूत
सेवेकरी
माणुसकी
आहे खरी...७!
