मामाच्या गावाला जाऊ या
मामाच्या गावाला जाऊ या
मामा मामा येतो तुझ्या गावाला मला आवड आहे तुमच्या गावाची...
सर सर त्या उन्हात सुद्धा खाऊ आणायला मागे पुढे पाहत नाही म्हणून आहे आवड तुमच्या नावाची...
खाऊन आंबा जांभूळ करवंद, तुमच्या गावी फिरून फिरून डोंगर...
दिवसभर हिंडत फिरत ऊनात,
मामाच्या गावी होऊन मदमस्तक
खाऊ देई गुळ शेंगा अन् साखर...
पण या वर्षी मामा नाही गूळ शेंगा साखर...
महाभयंकर आलाया कोरूना रोग.
फक्त दिसते मामीच्या हातची भाकर...
म्हणूनच घरी राहू सुरक्षित आम्ही दोघं.
मामीच्या हातचा तांबडा-पांढरा
कधी बसून आम्ही खाईल दोघं...
यंदाही असाच चालला उन्हाळा
पण हा महाभयंकर नाही गेला करून रोग...

