STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

माळवरचे फूल-कविता

माळवरचे फूल-कविता

1 min
1.1K



सांग फूल राणी तू रुसलीस का ?

काय तुझ्या मनात मला सांगना ?

कोवळी तुझी काया, निरागस माया

आतूर मी झालो खेळ खेळाया


रंग तुझे विविध रंगी, भुलवी मनाला

शुद्ध तुझे विचार आवडे तू धरतीला

तुझ्या सुगंधाने मोहीत झाले भ्रमर

तेही तुझ्या जीवनाचे आधार


रोज सकाळी रवि येतो तुला भेटण्याला

त्याच्या मनातील गुपित सांगण्याला

सोनेरी शालू आणतो तुला नेसण्याला

खरोखर जीव त्याचा तुझ्यावर जडला


अबोल तुझी भावना काही तरी बोलना

तुझ्याशी बोलण्याची त्याची हिंमतच होईना

काय तुला विचारु त्यालाही कळेना

हिंमत दे जरासी तुझ्या नव साजना


एव्हढा मोठा विश्वव्यापी तुला लाजला

प्रेमाने तुझ्या तो वेडापिसा झाला

उशीर नको करू आता काय ते सांगना

तुझ्यातील गुपित तूही सांगना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational