STORYMIRROR

Neeraj Shelke

Romance

3  

Neeraj Shelke

Romance

माझ्यात मी ना उरलो

माझ्यात मी ना उरलो

1 min
272

प्रथम तुज पाहताक्षणी

शर्करेसम विरघळलो ,

प्रेमात तुझ्या विरुनी 

माझ्यात मी ना उरलो !!


स्वप्न होते पाहिले तुझे

स्वप्नात स्वतःस हरलो ,

प्रेमात तुझ्या विरुनी

माझ्यात मी ना उरलो !!


तूच सांग सखे आता

का तुझ्यातून मी सरलो,

प्रेमात तुझ्या विरुनी

माझ्यात मी ना उरलो !!


दुःखाशी भांडता भांडता

सुखपण मी विसरलो ,

प्रेमात तुझ्या विरुनी 

माझ्यात मी ना उरलो !!


झाल्या किती यातना

अंतरीचं मी गं झुरलो ,

प्रेमात तुझ्या विरुनी 

माझ्यात मी ना उरलो !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance