STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

माझ्यास्तव हा जन्म तुझा

माझ्यास्तव हा जन्म तुझा

1 min
684

माझ्यास्तव हा जन्म तुझा का विसरूनी तू जाशी


रंगमहाली फिरतो शोधत, वेडावून मी कधी तुला

वेध घेती या जीवाचा, काय तुझी ही प्रीतकला

अपूर्ण माझ्या स्वप्नी, एकदा येऊन सांग मला

मिळेल केव्हा किनारा, अबोल माझ्या प्रीतीला

फिरवून मजला तुझ्या भोवती, भूल अशी का देशी

माझ्यास्तव हा जन्म तुझा का विसरूनी तू जाशी



कैफ तुला या प्रेमाची,सांग कशी सांगू

श्वास एक अश्या दोन तनू कधी, रेशीमगाठीत बांधू

हात दे या हाती तुझा, मग भविष्यात रंगू

स्वप्नातल्या त्या प्रणयक्षणांत, थोडे हसू थोडे भांडू 

सांग अनामिक मजपासून स्वतःला, दूर दूर का नेशी

माझ्यास्तव हा जन्म तुझा का विसरूनी तू जाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance