माझ्या प्रेमाचा फुलपाखरू.....
माझ्या प्रेमाचा फुलपाखरू.....
माझ्या प्रेमाचा फुलपाखरू....
माझ्या प्रेमाचा फुलपाखरू
तुझ्यासाठी लागलाय झुरू ।
प्रेमात तुझ्या रंगुनिया सखे
केले प्रेमकाव्य लिहायला सुरू ।।
तुझ्यासाठी हसणे माझे
तुझ्यासाठीच गं गाणे ।
जिणे तुझ्यासह मज गं
तुझ्यासहच संपून जाणे ।।
ध्यानीमनी तुझेच रूप
आवडते मज तू गं खूप ।
सुखी ठेवण्या तुज गं सखे
लावणे मज देवाला दीप आणि धूप ।।
अकल्पनिय सौंदर्य तुझे
चित्त माझे वेधून घेई ।
चालता-फिरता, उठता-बसता
तुझीच आठवण येई ।।
अजु करतो विनवणी तुज
माझ्या प्रेमाला घे समजून ।
भेटण्या मज प्रेमाने तू
वधुसारखी ये गं सजून ।।

