माझ्या ओल्या जखमांना
माझ्या ओल्या जखमांना
भरल्या जखमेवर विरही
ओरखडा एक ओढून जा ।
माझ्या ओल्या जखमांना
जातांना मीठ चोळून जा ।।
होऊदे तुकडे झालेतर
पाटी हृदयाची फोडून जा ।
हृदय पटलावर नाव तुझे
आता तेही तू खोडून जा ।।
प्रेमाची ही धुळ पसरली
जातांना ती झाडून जा।
वेड लावतील अश्रृ तुझे
गाळने तेही टाळून जा ।।
चुकलेले एक गणित प्रित ही
अर्ध्यावर तू ही सोडून जा ।
कधिच तुला ते जमले नाही
उत्तर चुकीचे खोडून जा ।।

