STORYMIRROR

Shravani DNG

Inspirational

3  

Shravani DNG

Inspirational

माझ्या नजरेतला पहिला पाऊस

माझ्या नजरेतला पहिला पाऊस

1 min
314

जर कुणी विनाकारण खूश होत असेल तर समजावं की पाऊस आलाय.

जर घराघरात खमंग भज्यांचा वास येत असेल तर समजावं की पाऊस आलाय.

जर लहान पोरं आपल्या वह्या पुस्तकांना प्लास्टिकच्या पिशव्या घालत असतील तर समजावं की पाऊस आलाय.

जर न्युज चॅनलवरचे पत्रकार रस्त्यांवरच्या खड्ड्यांविषयी भरभरून बोलत असतील तर समजावं की पाऊस आलाय.

झी मराठीवरचे आपले शिव गौरी, श्री जान्हवी, प्रेमात पडताना दिसले कि समजावं पाऊस आलाय.


ऑफिसमधील पूर्ण फ्लोर जेव्हा रिकामा दिसतो आणि कॅन्टीनमध्ये चहाचा मस्त दरवळणारा वास येतो तेव्हा, समजावं की पाऊस आलाय.

जेव्हा नेहमी उदास असणारं आपलं मन खिडकीकडे पाहून उगाच हसतं तेव्हा समजावं की पाऊस आलाय.

जेव्हा लोकांचे दर्दभरे वॉट्सअँप डीपी & स्टेटस, अचानक आनंदी आणि प्रेमळ पिक्चर्समध्ये बदलतात तेव्हा समजावं की पाऊस आलाय.

जेव्हा जेवणाच्या टेबलवर फॅमिली एकत्र बसून या वेळस कुठे सहल काढायची यावर अगदी उत्साहात चर्चा करते तेव्हा समजावं की पाऊस आलाय.


जेव्हा अबोल नाती अलगद उमलतात आणि जवळ असलेली नाती आणखी घट्ट होतात, तेव्हा समजावं की पाऊस आलाय.

जेव्हा शेतकरी आनंदाने गहिवरून जातो, घामाने भरलेल्या त्याच्या कपड्यांना, मातीचा सुंगंध येतो, तेव्हा समजावं की पाऊस आलाय.


जेव्हा एखादी चिमुरडी थंडीत कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला, अंगातला ठिगळ लावलेला स्वेटर त्याच्या अंगावर पांघरून जाते...

माणसातल्या देवाकडे पाठ फिरवणाऱ्या माणसांच्या पाठीवर, माणुसकीचे धडे गिरवून जाते...

 ….आणि तेव्हा समजावं की... खरंच पाऊस आलाय!  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational