STORYMIRROR

Shravani DNG

Others

3  

Shravani DNG

Others

लग्नानंतरचा पहिला पाऊस

लग्नानंतरचा पहिला पाऊस

1 min
12.2K


पावसाचे हे नज़ारे पाहिले न मी कधी,

जुनाच तो पाऊस नव्याने मारे घट्ट मिठी !!


वेगळी होती ही हितगुज, ठिकान ही वेगळे

वाटे जणू भेटाया सासरी, आले माहेरचे सगळे

का वाटे नवी ही पाऊलवाट, मखमली न कळे

वाटते सत्य होतील मज़या स्वप्नांचे ते मळे !!


जाणीव आहे भेटतिल वाटेत आव्हाने मोठी ,

पण विश्वास आहे पूर्ण होतील स्वप्ने थोड़ी छोटी !


बरसतो तो जसा न विचार करता,

अपनहि तसे जगावे, संकटाना न डरता !


जैसा तो शेतकऱ्यांचा घाम पुसून टाकतो ,

ाटे जणू तो त्यांच्या जिद्दी समोर नम्र पने वाकतो !


जाताना पाऊस जो विश्वास देऊन जातो,

परतण्याच्या आशेवर सगळ्यास ठेवून जातो !


आपनही तसेच जगावे, आशे समोर झुकावे,

जणू सापसीडीच्या खेळामधे पुन्हा पुन्हा हूकावे !


पण पुन्हा परतावे एका नव्या जिद्दीने,

सापाचा विचार न करता शिडीच्या दिशेने !


आनंद घेण्यासाठी अणि देण्यासाठी,

छोटी मोठी स्वप्न साकारण्यासाठी,

आयुष्याच्या पटलवार नवे आकड़े टाकण्यासाठी,

हरवलेले काही पुन्हा मिळवण्यासाठी!!!


Rate this content
Log in