Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shravani DNG

Others

3  

Shravani DNG

Others

दुनियेला माझ्या या कोणाची नज़र लागली

दुनियेला माझ्या या कोणाची नज़र लागली

2 mins
11.3K


पाहता पाहता, सारी पाखरे उडु लागली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


चहाच्या कपांप्रमाणे जमनारी ती माणसांची गर्दी ,

न जाने कोणत्या दिशेला निघून गेली !

ओसाड अमृततुल्ले, पहाटेचि वाट बघू लागली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


डोक्यावर ओझी घेऊन जाणारे, ते छोटे छोटे पाय,

परिस्थितीच्या विशानुचे, मोठे डंक सहत जाय !

थिएटर समोरची गर्दी आता, राशन वाटणाऱ्या ट्रक समोर दाटली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


शाळेत जाणारी पानीपुरी, वडापाव खानारी, ती मुले कुठे हरवली,

गरिबांची घर दार सोडून गेली, तर श्रीमंताची ऑनलाइन क्लास मधे रमवली !

असून सगळी सामग्री, कुणाला व्यंजने नाही जमली,

तर काही लोकांच्या घरात, खिचड़ी तेलाशिवाय शिजली !

लक्षात ठेवतील, झोपड़ीआड़ दडलेली ती कोवळी मने, दुनिया त्यांच्यासोबत कशी वागली

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


कालचक्रने जणू , घड्याळेच बंद करून टाकली,

काय गरजेच आहे अणि काय नाही, हे द्वंदे मनात वाजली !

या काळात माणस प्राण्या प्रमाणे अणि प्राणी माणसाप्रमाणे वागली

कुणाला विशानुची, कुणाला धंद्यांची, कुणाला पैशाची कुणाला भूकेचि तर कुणाला एकटेपणाची भीति वाटू लागली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली


काही जीवाणी, अशी रस्त्यात माने टाकली,

देशाची अर्थव्यवस्था, जणू कोलमडून वाकली !

पदवीधर झालेल्या पिढीला, नौकरी ची चिंता ग्रासली

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


इथे प्रत्येक जन, आपला लढा लढतोय,

जगण्याचे अणि जगवण्याचे , मार्ग नवे शोधतोय !

जरी सावरणयात या कठिन समयी, उणीव थोड़ी राहिली

रस्त्याच्या कडेने, पाणी अणि जेवण वाढणाऱ्या लोकांमधे, माणुसकी मी पाहिली !

सुन्न ती बाजार पेठ , भीति पोटी होती झाकली,

न जाने दुनियेला माझ्या या कोणाची नज़र लागली !


घर काम करणाऱ्या मावशीला, कामावर जाता आल नाही

पण मलकिनीने पगार देऊन, नैतिकतेच भान दाखवल काही !

परदेशातली पाखरे, कधी नव्हे ती स्वदेशी साठली,

पानी पूरी वाल्या भैयाला, मराठी भावाची मदत लाभली !

कुतूहल इतके आभाळी दाटले, घेण्या वर्दी पृथ्वीची, पावसाने वर्दी लावली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !


मला विश्वास आहे माणूसकीवर , एक दिवस सगळं ठीक होऊन जाईल,

ही वेळ खुप काही शिकवून जाईल,

या पिढीवर संस्कार घडवून जाईल,

आठवणींमधे हा काळ, सदैव आमच्या राहिल !


सांगू कधी, गोड़ कडु अनुभवांची, मेजवानी कशी चाखली,

न जाने दुनियेला माझ्या, या कोणाची नज़र लागली !!


Rate this content
Log in