माझ्या मनातलं वादळ...
माझ्या मनातलं वादळ...
माझ्या मनातलं वादळ...
माझ्या मनातलं वादळ
कधी शमेल का....?
आणि माझ्या मनात
चाललेली उलथापालथ
कधी तुला कळेल का...?
भरून आलेलं आभाळ
धो धो बरसून मोकळं होतं
पण....
माझं काय रे......?
भरून येतं मनं अनेकदा
आणि डोळ्यांच्या कडा
नुसत्याओल्याकरून
निपचित पडतं.
समुद्रातलं वादळ तर
नुसतं थैमान घालतं
होत्याचं नव्हतं करून ठेवतं.
अन्....
माझ्या मनातलं वादळ.....
मनातल्या मनात माझ्या
धुमसत राहतं आणि
मला पार कोलमडूनं टाकतं......
