Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti Druge

Romance Others

2  

Jyoti Druge

Romance Others

माझिया प्रियाची प्रित( प्रेम)

माझिया प्रियाची प्रित( प्रेम)

1 min
282


ध्यानीमनी तुझेच नाव असते

खरोखर बरोबर तू नसताना

तूच बरोबर असणे मज वाटते

हेच खरे प्रेम असते ।१।


कणभर अंतर दोघांत न उरते

इतका तू-मी अन् मी- तू सारखेच वाटते

तुझ्यात मी अन् माझ्यात तू जिवित भासते

हेच खरे प्रेम असते ।२।


रोज प्रत्येक घडीला आपले भेटणे असते

अशीच मी सप्तपदी सप्तवचनात

तू तिथं अन् मी तिथं नित्याने चालते

हेच खरे प्रेम असते । ३।


प्रज्ञेशात तूच विराजमान असते

त्यांच्या मधाळ वाणीतून शब्द तुझेच कानात

तो बाबा म्हणे तुझे त्यांसी सांगणे असते

हेच खरे प्रेम असते । ४ ।


तुझ्यात ती हास्यमुद्रा अवखळते

असतोच तू दूरदेशा पण न वाटते

दिसतोच तू माझ्या सवेत भासते

हेच खरे प्रेम असते । ५ ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance