माझी शाळा
माझी शाळा
शिक्षणाच्या ज्योती प्रज्वलित करणारी
ही शाळा माझी शतायुषी,
विविध कलागुणांना वाव देणारे माझ्या
शाळेतील शिक्षक फार हौशी
या शाळेतील विद्यार्थिनी पारंगत
जणु चौसष्ट कलागुणांनी,
ही घडली शाळा साक्षात
सरस्वती देवीच्या आशीर्वादानी
शाळेने दिले धडे राजकारणाचे
शालेय संसद निवडीने,
शिक्षकांनीही केले कार्य ज्ञानदानाचे
मोठ्या आवडीने
शालेय खिचडीने सांगितले महत्त्व
पोषक घटकांच्या ग्रहणाचे,
विविध उपक्रमांतून लागले
वळण शिस्त पालनाचे
टाकले पाऊल शालेय जीवनाच्या
अंतिम वर्षात जड अंत:करणाने,
समजावले निरोप घेणा-या मनाला की,
आता शाळेत यायचे ते 'गुणवंत विद्यार्थी
आणि प्रमुख पाहुणे' म्हणून या आश्वासनाने
