मीच ती...
मीच ती...
चंद्र आणि चांदण्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणारी,
निशिगंधा, रातराणी यांना उमलताना कुतूहलाने पाहणारी,
नीरव वाटेवर अंधाराच्या सोबतीने चालणारी ,
काजव्यांच्या सोबतीने नाचणारी,
कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख असणारी,
वाऱ्याची झुळूक येताच वृक्षपर्णांसमवेत हसणारी,
खळखळणाऱ्या सागरी लाटांवर स्वार होणारी,
डोंगरमाथ्यावरील एकाकी खडकांना आधार देणारी,
निशाचरांच्या हालचाली बघून थक्क होणारी
होय मीच ती निशा, रजनी, रात्र.

