STORYMIRROR

navmi dharmadhikari

Others

4  

navmi dharmadhikari

Others

मान्सूनचे वारे....

मान्सूनचे वारे....

1 min
349

 दाटून आले होते काळे घन ,

 तेवढ्यात न्हाऊन निघाले मृदेचे कण.

 

कधी ऊन तर कधी पाऊस 

चालू होती लपंडावाची मालिका,

एकाएकीच सुरू झाली अविरत सरींची तासिका.


सतत बरसणाऱ्या सरींनी बीजे अंकुरित केली ,

वसुंधरा हिरवा शालू लेऊनी नटली.


आनंदून गेले मन पाहून श्रीमंती विविध वृक्षलतांची,

मौज वाटली निसर्गाच्या आविष्काराची.


मात्र , वरुणराजाने अचानक घेतला

रुद्रावतार,

नदीने अगदी मानवी वस्तीतही सुरू केला‌ मुक्तसंचार.


कोलमडून पडले महाकाय वृक्षही 

मग काय लागणार निभाव त्या 

कोवळ्या अंकुराचाही ?


अवघ्या काही दिवसांत होत्याचे 

नव्हते झाले ,

मान्सुनचे वारे विनाशाचे ठरले....!    


Rate this content
Log in