हास्य
हास्य
कधी हसणे असते आपुलकीचे,
तर कधी लाजून हसणे असते
नव्या नवरीचे
अनेकजण फिदा होतात
ते तारकांच्या हास्यावर,
तर काही जण हसतात ते
इतरांच्या कमतरतेवर
आपण अनेकदा स्मितहास्य करतो ते
आपली माणसे भेटल्यावर,
काही वेळा समाधान वाटते ते
आपल्यामुळे कोणी आनंदाने हसल्यावर
झ-याचे असते ते खळखळून हसणे,
पक्ष्यांचे असते ते गातगात हसणे
आपण अनेकदा म्हणतो की,
काहीजण उगाचचं हसतात !
पण असे कोण म्हणते की
हसायला कारणेच लागतात ?
