महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन
स्वराज्य स्वप्नपूर्ती जाहली या
महाराष्ट्र दिनी
आनंद बहरला महाराष्ट्रीयांच्या
मनी
मराठी भाषिक राज्य ही
नवी ओळख मिळाली महाराष्ट्राला,
थोर हुतात्म्यांनी राज्यात
परत आणले मुंबईला
दिवस हा महाराष्ट्रासाठी रुधिर
समर्पित करणा-यांचा ,
त्यांच्या स्मरणार्थ करुया गौरव
मराठी भाषा आणि परंपरांचा.
पुन्हा नको महाराष्ट्र स्मरण्यासाठी
मुहूर्त महाराष्ट्र दिनाचा,
नुसताच शुभेच्छांचा वर्षाव न करता
करुया संकल्प या महाराष्ट्राला जपण्याचा
