माझी मैत्रीण पुस्तक
माझी मैत्रीण पुस्तक
आयुष्याच्या वाटेवर खूप माणसे
मी कमावली माझ्या या स्वभावाने
स्वभावाने नाते जुळले सौख्याचे
जुळलेले नाते जोडले ते प्रेमाने.
जिवनाच्या वाटेवर मित्र-मैत्रिणी
अनेक असे आले गेले वेगवेगळे
अर्ध्यावर डाव मोडून ते सारेजण
आप आपल्या वाटेने गेले सगळे.
पण बालपणाची आहे माझी मैत्रीण
परम प्रीय मैत्रीण दिली होती मजला
माझ्या त्या थोर गुरुजींनी मला शाळेत
आजही तिचा सहवास प्रीय वाटे मला.
सुख दुःखात किंवा आजरपणात
सतत सोबत तियेची मज लाभली
त्याच्यामुळेच मी पदव्या मिळवल्या
अन् त्यामुळे जगाशी ओळख जमली.
माझ्या खास ह्या पुस्तक मैत्रिणीमुळे
कधी जाणवला नाही मला एकटेपणा
तिने ज्ञान बुद्धी वाढवली सर्व क्षेत्रात
आज ही आनंद देते मज म्हातारपणा.
आयुष्यभर साथ देणारी मैत्रीण खरी
एकच एक असते पुस्तक माणसाला
ह्याने व्यसन लावले मज वाचण्याचे
तेच वेड वाचनाचे देतो आनंद मनाला.
वाचाल तर वाचाल मंत्र जीवनाचा
सवय लावून घ्या स्वतःला व मुलांना
सोने होईल त्यांच्या आयुष्याचे खास
जर मित्र बनवले त्यांनी ह्या पुस्तकांना.
