STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

3  

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

माझी मायबोली

माझी मायबोली

1 min
219

टाळ्यांच्या गजरात

मृदुंगाच्या चालीवर

अभंगातील गोड वाणी

माझ्या विठोबाच्या कानी


नाद टाळ चिपळ्यांचा

कपाळी चंंदनी टिळा

माझ्या विठुरायाचा खेळ 

पंढरीच्या चंद्रभागी तिरा


मराठी बोली

 माझे मराठी गीत

मराठीच्या भूमीतील

आमची घामाचे कष्ट


सावित्रीच्या लेकी आम्ही

 शिवरायांचे भक्त

महाराष्ट्राच्या मातीतल

माझं मराठी रक्त


मराठीतील अलंकार आणि

भाषा सौंदर्यातील म्हणी 

रस्व दीर्घ प्रवासवर्णनेे मराठीच्या दारी


भाग्य ते आमुचे

आम्ही मराठी लेकरं

माझ्या माय मराठीच्या

शरण मी सर्वत्र


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational