STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

महिमा स्वातंत्र्याचा

महिमा स्वातंत्र्याचा

1 min
234

स्वातंत्र्य भारताचा

महिमा वंदितो *अंतरी,*

तुज पुजिले आता

केले प्रेम मी *राष्ट्रावरी.*


सह्याद्री हा बोलतो

जयजयकार *क्रांतीचा,*

फडकला तिरंगा

माझ्या प्रिय *हिंदुस्थानचा.*


रणांगणी भिडला

अन्याय दूर *होण्यासाठी,*

शूर शिपाई माझा

हर वार *झेलण्यासाठी.*


भाग्य लाभले मला

जन्मलो या *मायभूमीत,*

पूर्व जन्माचे पुण्य

किती घालू मी *दंडवत.*


स्वराज्य रक्षेसाठी

रक्त वीरांनी त्या *सांडले,*

मुक्त केल्या शृंखला

पारतंत्र्यातुन *सोडले.*


स्वातंत्र्याचा तो हक्क

शुरानी असा *मिळविला,*

देशभक्तीच्या पायी

रक्तात तिरंगा *पाहिला.*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational