श्रावण आला
श्रावण आला
श्रावण आला श्रावण आला
आला आनंदाला बहर
लाजरे बुजरे ढग सारे
झाले काळे भोर
रिमझिम पाऊस आला
धावत आली सर
चिंबचिंब भिजताना
पाखरे झाली सैरभरं
नवि नवरी वसुंधरा ही
बिंदी चंद्राची कोरं
घेऊन आला शालू सप्तरंगी
हिरवा हिरवा डोंगर
पहाट कोवळी मस्त आली
झरे झिरव्यांचा काहूर
सुर सनईचा वाजवून वारा
धुई धुई नाचतो मोरं
झाडे झुडपे पाने फुले
थेंब थेंब दवांनी झालीत अधीर
इंद्रधनुष्याच्या कुशीत दिसे श्रावण सुंदर
