अमुचा देश महान
अमुचा देश महान
एकजुटीने चला बदलू या आपण आपला वेष
प्रिय आम्हाला अमुचा भारत देश ।।धृ।।
हिमालयाच्या कुशीत वसली आमुची माती
रक्ताहूनही प्रिय आम्हाला राष्ट्रभक्तीची नाती
आण घेऊया एकतेची करू जगाला उपदेश ।।१।।
वीर शिवाजी, प्रताप, बाजींचे होतो आजही भास
जगात साऱ्या आजही गाजतो अमुचा इतिहास
या देशाची गौरवगाथा हाच आहे अमुचा आदेश ।।२।।
स्वातंत्र्याचा दिवस मोठा आहे आपुला सण
ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे आपण करू या स्मरण
एकजुटीने लढू या सारे देऊ देशभक्तीचा संदेश ।।३।।
तीन रंगाचा तिरंगा देशप्रेम मनात झळकवी
आस उद्याची हाती हेच आपुल्या रंगातून शिकवी
वाचता इतिहास सुधारकांचा मनात भरतो आवेश ।।४।।
