पाऊस
पाऊस
1 min
225
मेघ दाटूनी नभी
वाहते गार हवा
आला पाऊस आला
हळुवार पसरूनी गारवा
बरसतील धुंद आता
चोहीकडे पाऊसधारा
सुटेल गंध मृदेचा
भिजेल आसमंत सारा
चिंब चिंब करुनी
बरसेल आता सर्वत्र
वादळ वाऱ्या सोबत
बदलेल आता चित्र
प्राणी, पक्षी माणसांना
देऊनी नवी एक आशा
शिकवतो तू साऱ्यांना
आयुष्य जगण्याची भाषा
