महात्मा जोतीराव फुले
महात्मा जोतीराव फुले
अंधश्रद्धेला दूर करून केला निरक्षरतेचा खात्मा
गोरगरीब जनतेसाठी झालात तुम्ही परमात्मा
रोवूनी शिक्षणाचा पाया केले समाज परिवर्तन
केली समाज जागृती विद्या हेचि एकमेव घन
मुलींनीही घ्यावे शिक्षण अशी मनात होती खंत
बनवून शिक्षिका पतीला केला विषमतेचा अंत
अंधार दूर करून ज्ञानाचा सूर्य उगवला
दाही दिशांनी प्रकाश देत सूर्य वाट चालू लागला
साऱ्या समाजाला घेऊन ज्योती लावली ज्ञानाची
मुलींची शाळा काढून महती पेटवली विद्या दानाची
सत्यधर्म ग्रंथ लिहूनी उडवली सर्वांची भ्रांती
कास घरून विज्ञानाची ठरलात तुम्ही क्रांतिज्योती
