आरसा
आरसा
1 min
12.7K
आरसा म्हणजे काय असतं
ज्यात आपलं प्रतिबिंब दिसतं
काय कमाल त्या आरश्याची
ज्यात खरं खोटं काहीच नसतं
आरसा नव्हे काच नुसती
त्यात आपुल्या छटा दिसती
आयुष्याच्या रंग संगती
ज्या आपुल्या सोबत असती
आरसा खोटं बोलत नाही
अन खरंही सांगत नाही
जे आहे तेच दिसणार
खोटी स्तुती मांडत नाही
शिकावे माणसानेही थोडं
आरश्याकडून काही
चेहरा सुंदर, मन मळकं
मग का तू आरश्यात पाही
