माझी होशील का?
माझी होशील का?
प्रीत तुजवर जडली
साथ अखंड देशील का
भेट अशीही अवचित घडली
सांग सखे तू माझी होशील का
काहूर प्रीतीचे मनात उठले
हात हाती देशील का
पाहून तुजला मनात आले
सांग सखे तू माझी होशील का
मौन माझे कळावे तुला
साद भावनांची गवसेल का
हृदयाची फक्त तार न छेडता
सांग सखे तू माझी होशील का
प्रेमाची माझ्या ठेवून जाण
प्रीतफुल होवून येशील का
जीव माझा तुझ्यात गुंतला
सांग सखे तू माझी होशील का
होवू दे तुझे आगमन माझ्या जीवनी
प्रेमवेड्याला अर्थ प्रेमाचा सांगशील का
जगणे माझे सार्थ करण्या
सांग सखे तू येशील ना....

