STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

माझी आई

माझी आई

1 min
183

किती करावे तुझे कौतुक 

शब्द अपुरे पडती माझे।

परतफेड नाही करू शकत

त्या उपकारांची तुझे ।।


अमृतवाणी मला तू

पाजीलास ग पान्हा।

जसे यशोदेच्या मांडीवर

कृष्ण बाळ तान्हा।।


गुण अवगुणांचा माझ्या

केला तू विलय।

सर्व गुन्हे माफ होती

असे तुझे न्यायालय।।


तुझ्या कुशीतली झोप

आजच्या संसारात नाही।

पुढचा जन्मही तुझ्या गर्भात मिळो

ही वाट मी पाही।।


जगावे पुन्हा पुन्हा

येऊनी तुझ्या मी पोटी।

सर्वच दुनिया तुझ्या विना

वाटे मला खोटी।।


तूच माझ्या जीवनाची

पालटलीस ग काया।

साष्टांग नमन करुनी

पडतो तुझिया पाया।।

 

प्रेम तुझे आहे आई

या जगाहून भारी।

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा

आईविना भिकारी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational