माझे प्रेम
माझे प्रेम
नजरेत
तो भरला
पाहताच
आवडला
कसे सांगू
कसे बोलू
मन माझे
लागे डुलू
आरशात
मुरडणे
खुदकन
ते हसणे
बेधुंद त्या
भावनांचा
खेळ कसा
हा मनाचा
घालमेल
ही मनीची
प्रतीक्षा ही
होकाराची
माझे प्रेम
खुणावते
तुज का हे
सतावते
अखेर ती
आली घडी
आम्ही झालो
सवंगडी

