STORYMIRROR

Rajiv Masrulkar

Inspirational

5.0  

Rajiv Masrulkar

Inspirational

माझा शिक्षक

माझा शिक्षक

1 min
2.3K


मनापासुनी खरा असावा माझा शिक्षक

प्रसन्नतेचा झरा असावा माझा शिक्षक !


ज्ञानपिपासू उदार निर्भय सत्यप्रियही

कठोर पण शर्करा असावा माझा शिक्षक !


अन्यायाला भेदाला अंधत्वालाही

निःस्वार्थी हादरा असावा माझा शिक्षक !


सूर्यासम तेजस्वी, चंद्रासम शीतल अन्

क्षमाशील, जणु धरा, असावा माझा शिक्षक!


माता बंधु बाप मित्र दिग्दर्शक प्रेरक

दुःखातही आसरा असावा माझा शिक्षक !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational