STORYMIRROR

Sailee Rane

Tragedy Others

4  

Sailee Rane

Tragedy Others

माझा न राहिलो मी

माझा न राहिलो मी

1 min
358

राजकारण आहे छंद वेडा

जो यात पडला 

तो झाला वेडा पार


या राजकारणापायी

विसरला माणूस नातीगोती

सारे चाले हे फक्त खुर्चीसाठी


या राजकारणात 

सगळेच असती पैशाचे खेळ

मात्र सत्याशी न बसे मेळ


जो पडला या राजकारणात

तो बुडून गेला भ्रष्टाचाराच्या सागरात

मग वाईट विचारच मनात


देश स्वतंत्र झाला तेव्हा होते

ते खरे राजकारणी पक्ष

होते देशासाठीच ते दक्ष


या राजकारणापायी 

भाऊच होई भावाचा वैरी

नाती रक्ताची विसरून सारी


माणूस म्हणून जगायला 

विसरला आहे हा माणूस

कारण त्याला राजकारणाची हौस


या राजकारणापायी 

खरेच जगायला विसरलोय आम्ही

म्हणावं वाटतंय माझा न राहिलो मी

खरेच माझा न राहिलो मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy