माझा हरी
माझा हरी
कृष्ण पक्ष अष्टमीला,
मध्य रात्रीच्या प्रहराला,
देवकी वासुदेव ह्यांना पुत्र झाला,
जो पुत्र होता आठवा
वध करणारा कंसाचा, मथुरेला
काळजी ती आई बापाला,
लपवायचे कसे बाळाला
झाली माया, पहारेकरी झोपला
घेऊनी डोईवर बाळाला,
वासुदेव निघाले यमुना नदीला,
यमुनेला पुर होता आलेला,
बाळाचा पाय लागता पाण्याला,
पूर नदीचा ओसरला,
वासुदेव आले गोकुळेला,
यशोदा नंदाच्या घरी ठेवले बाळाला...
पहाटे च्या प्रहराला,
पाहुनी त्या गोंडस बाळा
हर्ष झाला सबंध गोकुळा..
यशोदेच्या लाल आता,कृष्ण झाला,
असा आमचा हरी जन्मला जन्माष्टमीला
असा आमचा हरी जन्मला जन्माष्टमीला
