माझा देश....
माझा देश....
माझा भारत देश महान म्हणताना वाटतो अभिमान...
सगळेच देशाचं नाव उंचावण्यासाठी तत्परतेने आहे तयार...
आपले सैनिक डोळ्यात तेल घालून दिवस रात्र देशाचं रक्षण करतात...
खेळ जगत देशासाठी सुवर्ण पदके लढुन मिळवतात...
फिल्मी दुनिया ही पुरस्कार कला सादर करून आणतात ...
सामान्य माणूस ही आपली जबाबदारी निभावतो...
प्रत्येक नियम पाळून आणी टेक्स भरुन देशाला हातभार लावतो...
पण काही दुष्ट लोकांमुळे देशाचं नाव ढासळत...
सगळीकडे वाईट बातमी पसरते की ह्या देशात असंच चालतं
उगीच देशाला नाव ठेवली जातात काही लोकांमुळे...
देश होता, आहे आणि राहणार अभिमानस्पद...
पण असले दुष्ट लोक आहेत देशासाठी लज्जास्पद....
