STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

माझा देश

माझा देश

1 min
194

आम्ही कोण म्हणोनि काय पुसता

येता मनीं असा विचार जयाच्या

नागरिक च असे, तो भारताचा

नसा नसात देशभक्ती तयाच्या


जिथे दिसे समता भाव सर्वत्र

असुनिया जाती न् धर्म अनेक

न करी कधी भेद भाव तयात

तोचि असे "आम्ही भारतीय " एक


अभिमान हा , तयांना संस्कृतिचा

बाळकडू प्यायलेला संस्काराचा

परोपकारी जीव सदा तयाचा

भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा


रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता

विलीन केलीत संस्थाने अनेक

राखूनिया केवळ शब्दांचा मान

घडविला अखंड भारत एक.


अशी नांदे विविधतेत एकता

स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा

लाल -बाळ-पालांची स्मृती जगता

भारतीयांची जी , उंचाविते माथा


घडविण्या बदल नव्या युगाचा

पाऊल भारतीयांचे पुढे सदा

आली कितीही परकीय संकटे

न डगमगे मन , तयांचे कदा. .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational