माई
माई
अनाथांची माय, बनल्या सिंधुताई,
नकाेसी झालेली चिंदी,बनली अनाथांची माई
बालवयात झाला विवाह, साेसला प्रचंड सासुरवास,
भीक मागून पाेट भरले, दिली आधाराची कास
अनाथांच्या जीवनाला दिशा,स्थापना ममता सदनाची,
केले परदेश दाैरे, छाप पडे लिखाण व बाेलण्याची
शुन्यातून विश्व निर्माण,हजारो पुरस्कारांच्या मानकरी,
जन्म घ्या येथे पुन्हा, तुमची गरज धरतीवरी
