माहेरपण
माहेरपण
माहेरपण-- अस असावं-
लेकीला पाहून घराच्या भिंतीनीही आनंदाने न्हावं
आईबापाने लेकीचं साजर रूप डोळ्यात साठवून घ्यावं
माहेरपण-- अस असावं-
बहिणीला पाहून भावांनीही आनंदाच्या सरित चिंब भिजावं
साऱ्यांनीच तिला मायेच्या धाग्यात घट्ट विनाव
माहेरपण-- अस असावं-
आईबापाने मायेने लेकीला कुशीत घ्यावं
तिने हीं लहान होऊन आईबापाला घट्ट बिलगाव
माहेरपण-- अस असावं-
रुसेल ती हीं केव्हातरी तिला समजून घ्यावं
तिच्या रागाच परिवर्तन हसण्यात कराव
माहेरपण-- अस असावं-
निघतांना तिच्या हाताला साऱ्यांनीच घट्ट धरावं
काही दिवस थांब अजून, बर वाटेल म्हणावं
माहेरपण-- अस असाव-
भरभरून आनंदाच दान तिच्या ओंजळीत घालावं
माहेरपणाच्या त्या गोड क्षणातं तिनेही हरखून जावं