लॉकडाऊनवर बोलू काही...
लॉकडाऊनवर बोलू काही...


आला असा दिवस आपल्या नशिबी
लॉकडाऊन अनुभवला आम्ही
घरात बंद झालो होतो आपण
रस्त्यावर नव्हते कोणी
वाहनाचा आवाज नाही
सगळीकडे शांतता पसरलेली
चला लॉकडाऊनवर बोलू काही...
चार भिंतीचे घर पुन्हा गजबजले
कधीही न दिसणारे चेहरे घरात दिसू लागले
जेवणासाठी पंगत बसली
गप्पा-गोष्टींसह मज्जा-मस्ती ही आली
नवनवीन पदार्थाचा शिकण्याचा बसला मेळ
कोणी केली असेल मस्त भेळ
चला लॉकडाऊनवर बोलू काही...
काटकसरीने कसे जगायचे शिकवण दिली
बाहेर उगीचच न भटकण्या
ची सक्ती केली
नियम मोडणाऱ्यांना फटकेही मिळाले
शाळेतील रांगेची शिस्त इथे जाणवली
चला लॉकडाऊनवर बोलू काही...
वर्क फ्रॉम होमला थोड्यांनी प्राधान्य दिले
थोड्यांच भविष्यच संकटात अडकले
एका बाजूला विचार सुरक्षेचे
तर एका बाजूला चिंता पोटापाण्याची
कोणी पोहोचले पायी चालत आपल्या गावी
कोणी ढाळले अश्रू आपल्या माणसांसाठी
चला लॉकडाऊनवर बोलू काही...
खूप शिकवले खूप काही गमावले
आयुष्याची नवी कडा दाखवली
इतिहासात कधीही न घडलेल्या
घटनेत लॉकडाऊनने आपली नोंद दर्शवली...