Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kanchan Thorat

Romance Others

3  

Kanchan Thorat

Romance Others

लॉक

लॉक

1 min
211


' लॉक ' करून ठेवता आल्या पाहिजेत , 

काही गोष्टी , आवर्जून ; 

पहिल्या प्रेमाचा सुगंधी गंध अन्

ओझरते चुंबन . 


' लॉक ' करून ठेवता आली पाहिजे ,

 पहिल्या रात्रीची मदहोशी ; 

पहिल्या बाळाचा ' टया टया'आवाज कानाशी .


' लॉक ' करून ठेवता आली पाहिजे , 

चेहऱ्यावर येणारी सुरकूती ,

पैसा , सत्ता , प्रसिध्दी , दूर जातेय की काय ? 

याची भीती.


' लॉक ' करुन ठेवता आल्या पाहिजेत , 

पाहिजे असलेल्या , अन् नसलेल्याही गोष्टी .. 

पाहिजेत त्या 

खोलुन , हाताळून पुन्हा जपून ठेवण्यासाठी , 

अन् - 

नको असलेल्या , 

कधीच समोर न येण्यासाठी ..


बाईच्या अंतर्मनातील खोल कप्प्यात 

कोंडून ठेवलेल्या प्रियकराच्या , 

आठवणींसारखी .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance